आई तुळजाभवानीचा चांदीचा मुकुट गायब; गुन्हा दाखल…
धाराशिव (प्रतिक भोसले) : तुळजाभवानी मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा यांच्यासह सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे […]
अधिक वाचा...संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…
छत्रपती संभाजीनगर: एकाने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अतिप्रसंग करण्याला विरोध केल्याने या महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना लोणीखुर्द (ता. वैजापूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनुसयाबाई दामु जाधव (वय 75) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
छत्रपती संभाजीनगर: पैठणहून दुचाकीने घरी येत असताना समोरून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात आईसमोरच लेकराने जीव सोडला तर आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी परिसरात असलेल्या पाचोड-पैठण रस्त्यावर ही घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
अधिक वाचा...निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणेः पुणे शहरातील धायरी फाटा येथे आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिंहगड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोर कचरा गोळा करणाऱ्याला आज सकाळी […]
अधिक वाचा...शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
बीडः बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. संबधित […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
केडगाव (पुणे): दौंड तालुक्यातील केडगाव येथील दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रस्ता ओलांडत असताना चालत जाणाऱ्या दोन्ही भावांना एकाच वेळी चिरडल्याची घटना घडली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सह्याद्री पत्रा कंपनी जवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने चाललेल्या लाल रंगाच्या अज्ञात इनोव्हा गाडीने दोन भावांना चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास शेळके […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या…
गडचिरोली : एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुंडापुरीमध्ये (ता. भामरागड) घडली आहे. मृतांमध्ये आजी, आजोबांसह नातीचा समावेश आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. देवू दसरू कुमोटी (वय ६०), बिच्चे देवू कुमोटी (वय 55, दोघे राहणार गुंडापुरी ता. भामरागड) आणि अर्चना रमेश तलांडे (वय […]
अधिक वाचा...पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…
पुणे : लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याला कारने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ४) पहाटे स्वारगेटमधील सॅलिसबरी पार्क भागात घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभूजी लाल (वय ८५, रा.गुलटेकडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शशीकला मादीवाना (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. पुनावाला गार्डन […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…
धुळे : साक्री येथे पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय युवतीचे अपहरण केल्यामुळे धुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटले. […]
अधिक वाचा...युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरुन घरातच हत्या…
धुळे : धुळे शहरातील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका युवतीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) सांयकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत. निकिता पाटील (वय २२) असे या […]
अधिक वाचा...
