धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…
ठाणे : पतीच्या आजारपण तसेच मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे, असे सांगून महिलेकडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. असून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. तक्रारदार महिला यांचे पती अख्तर हे आजारी असल्याने त्यांनी उपचार करून ही सुधारणा होत नसल्याने […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्मिक कराड याला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…
पुणे: पुणे शहरात मकोका प्रकरणातील कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी गुंडासोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी ‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा 2 […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…
नाशिकः मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शहा दाम्पत्याने विष सेवन आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील राजू राजभर या रिक्षा चालकाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सावकारांनी केलेला जाच व्हिडीओद्वारे मांडला आहे. शिवाय, सुसाईड नोट देखील लिहिली आहे. निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजू यांनी हनुमंता गुंडे, महादेव फुले, राजीव कुमार आणि रजनी सिंह या चौघांकडून कर्ज घेतले होते. दहा […]
अधिक वाचा...नवी मुंबईत पोलिसांनी दरवाजा उघडला अन् आढळा माय-लेकाचा मृतदेह…
मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमधील घरात आई आणि मुलाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसत आहेत. गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (वय ४५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीटाचे वाटप अन् पुढे…
पुणे: नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमध्ये घडला आहे. परंतु, सर्व स्तरातून टीका करण्यात आल्यानंतर ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. 31 डिसेंबरच्या आधी ग्राहक अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक विविध प्रकारच्या युक्ती लढवत असतात. त्याचपद्धतीने […]
अधिक वाचा...मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला…
मुंबईः कल्याणमध्ये मराठी कुटुंबियाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज (शुक्रवार) विधानसभेत उमटले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माज दाखवणाऱ्याचा माज उतरवू असे विधान केले होते. फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली होती. त्यानुसार आता पोलिसांनी अखिलेश शुक्ला यांना ताब्यात घेतले आहे. शुक्ला यांना पोलिसांनी उचलण्यापुर्वी त्यांनी या घटनेवर आता मौन सोडले आहे. “तुम्ही […]
अधिक वाचा...धक्कादायक! मोबाईलच्या अतिवापर, तिसरीत शिकणाऱ्या मुलानं चिमुकलीवर अत्याचार…
पुणे : एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाने एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केले असता मुलाला जामीन मिळाला आहे. न्यायालयाने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले […]
अधिक वाचा...परभणी हिंसाचार! तीन पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश…
परभणी : परभणीत संविधान विटंबना झाली यानंतर जो काय प्रकार घडला, हे प्रकार घडत असताना पोलिस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात आली नसल्याची कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड धर्मपाल मेश्राम यांनी परभणीत दिली आहे. तसेच या प्रकरणामधील जनतेचा रोष असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले […]
अधिक वाचा...
