नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
मुंबई : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची नाशिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. या पथकाचे नेतृत्व IPS तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी आज (गुरुवार) अशोक खरात याची दोन ते तीन तास कसून चौकशी केली आहे. […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधांचा अभाव; नागरिकांची गैरसोय…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत येणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्यासाठी कुलर ठेवण्यात आला आहे. मात्र तो बंद अवस्थेत असल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. सध्या […]
अधिक वाचा...पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…
जालना : जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस प्रशिक्षणार्थीचे नाव राम बबन काळे (वय 25 ) असे असून ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, राम काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी […]
अधिक वाचा...Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायण गावमधील. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेत पोलिस दलात दाखल झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पदव्या मिळवल्या असून, पुढेही त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिस दलातील धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणतही त्यांनी आरोग्य आणि अनेक छंद जोपसले आहेत. पोलिस दलात आल्याचे समाधान […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी…
मुंबईः सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. विशेष शाखेचे उपायुक्त […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
रायगड: महाड तालुक्यातील एका पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याबाबत पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. आपला वरिष्ठांकडून जाणूनबुजून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जातीवाचक शब्द वापरून हिणवलं जात असल्याचा आरोपही संबंधित पोलिस निरीक्षकांनी केला आहे. रमेश तडवी असे पत्र लिहिणाऱ्या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहित आत्महत्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधील तब्बल 32 पोलिस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिस दलात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उचलबांगडी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने पोलिस स्टेशनमधील विविध […]
अधिक वाचा...नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…
नाशिक: सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) असे मृताचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या ‘ओव्हर डोस’ मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. […]
अधिक वाचा...अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृ्त्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते. मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहात होते. या […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…
धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन भीमा जाधव (वय ५५) असे मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि […]
अधिक वाचा...
