
पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; पुरस्काराने सन्मानित…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या उल्लेखनिय सामाजिक आणि पोलिस सेवेची दखल घेत त्यांना नुकताच ‘इंडिया स्टार जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील पुसेगावचे सुपुत्र असलेले रविंद्र कदम यांनी गेल्या ३० वर्षांच्या पोलिस सेवेत राज्याच्या विविध जिल्ह्यांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विशेषतः पुणे शहरात आल्यापासून त्यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे. लक्ष्मीनगर विभागात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले असून, अनेक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांचा केवळ गुन्हेगारांवर दराराच नाही, तर सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ते एक आधारस्तंभ बनले आहेत. लक्ष्मीनगर सारख्या भागात पूर्वी रिक्षाचालक येण्यास घाबरत असत, परंतु कदम यांनी निर्माण केलेल्या सुरक्षित वातावरणामुळे आता तिथे शांतता आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे स्थानिक महिलांनी त्यांचे अनेक सत्कार केले असून, “अशा अधिकाऱ्याची बदली होऊ नये,” अशी भावनाही व्यक्त केली आहे.
रविंद्र कदम यांच्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इंडिया स्टार झी गौरव पुरस्कारासह एकाच महिन्यात चार वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस खात्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…
Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!

