सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…
भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अभियंत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 49 महागडे प्लॉट, 14 एकर परिसरात पसरलेली तीन आलिशान फार्महाऊस आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सहाय्यक कार्यकारी अभियंता सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी […]
अधिक वाचा...परभणीत हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी…
परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाले आहेत. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे. अनेक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
नाशिक : तपोवनातील केवडीबन परिसरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी 72 तासात या प्रकरणाचा छडा लावला असून, कर्नाटकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सुटकेसमध्ये बॉडी सापडताच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे स्पष्ट झाले आणि अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच पीडित युवतीवर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि त्यांच्या सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव कोंबळे याला हजर केले असता, सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जसा पोलिसांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्ले करून तो झूम केल्यानंतर हो, व्हिडिओमध्ये दिसणारा तो माणूस मीच आहे…” अशी कबुली दिली. न्यायालयाने […]
अधिक वाचा...रिलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट….
सोलापूर: प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये (वय २५) हिने आपलं आयुष्य संपवले. सुरुवातीला तणाव आणि त्यातून झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. पण, आता या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा येथील रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येनंतर तब्बल 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
पुणे: आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या युवकाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत युवकाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांनी […]
अधिक वाचा...लेफ्टनंट शुभम हुतात्मा अन् पत्नीने २१ लाखांचा चेक घेतला अन्…
पाटणा (बिहार): आसाममध्ये गेल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जण हुतात्मा झाले. फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमारदेखील विमानात होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला देण्यात आलेल्या नुकसान भरपाईवरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून आणि हुलासगंज सीओंनी २१ लाख रुपयांचा धनादेश शुभम यांच्या पत्नी श्रेयाला देण्यात आला आहे. शुभम आणि श्रेया यांचे एकमेकांवर प्रेम […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]
अधिक वाचा...पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]
अधिक वाचा...
