हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…

नाशिक : नाशिक शहरातील रासबिहारी मेरी लिंकरोडवरील मानेनगर येथील शुभम कॉलनीत शनिवारी (ता. १५) रात्री घरातील गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

मानेनगरातील शुभम कॉलनी येथे डॉ. विशाल सोनवणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. रासबिहारी मेरी लिंकरोडवर त्यांचे क्लिनिक असून, त्यांच्या पत्नीही वैद्यकीय व्यवसायात त्यांना मदत करतात. शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना दोन्ही मुली घरी एकट्याच होत्या. रात्रीच्या वेळी एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्ये थांबवून घरी जात दोन्ही मुलींना जेवण दिले. ‘आई लगेच घरी येईल’, असे सांगून त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून ते पुन्हा क्लिनिकमध्ये परतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिक बंद करून घरी जाण्यास सांगितले. त्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. मात्र, नेहमीप्रमाणे दोन्ही मुली घरात दिसून न आल्याने त्यांनी घाबरून त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना स्वयंपाक घरालगतच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी टाकीत डोकावून पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यात तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने तिला टाकीतून बाहेर काढले, त्यानंतर दुसरी मुलगीही टाकीतच असल्याचे लक्षात आले.

दोन्ही मुलींना बाहेर काढल्यानंतर त्यांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पतीला फोन करून या भीषण घटनेची माहिती दिली. क्लिनिक आणि घर यामध्ये अंतर असल्याने डॉ. सोनवणे यांनी तात्काळ शेजारी राहणारे मदतीसाठी धावून जाण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलींना रात्री सुमारे 10.35 वाजता रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी दोन्ही निष्पाप बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!