प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…
नागपूर : लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपी अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर […]
अधिक वाचा...आरोपी पत्रकाराचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने घाटंजी पोलिस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 […]
अधिक वाचा...पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका मोटारीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली असताना हडपसरमध्ये 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर रोडवर नाकाबंदीच्या काळात दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हडपसर-सोलापूर रोडवर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका मोटारीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. ही रक्कम […]
अधिक वाचा...पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक
पुणे : पोलिसांच्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी पीडित मुलाने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडे तक्रार दाखल केली की, त्याचे वडील आदल्या दिवशी बेपत्ता झाले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी अपहरणाच्या आरोपाखाली बंगालमधील तिघांना अटक केली. घरमालकाने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. सोमवारी आरोपी नसीर मनिरुल हक अख्तर, नासिर मनिरुल हक अख्तर आणि साजिम करीम […]
अधिक वाचा...गुन्हे शाखा युनिट ६ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणीकाळभोर व पेरणे ते डोंगरगाव रोडवर येथे गुन्हे शाखा युनिट ६ने अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई केली. मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे २१/१०/२०२४ रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषिकेश व्यवहारे […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…
मुंबई : ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात भूमिका साकरणारी अभिनेत्री शबरीन हिला प्रेमप्रकरणातून पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराच्या भाच्याचे अपहरण प्रकरणात तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री शबरीन हिचे ब्रिजेश नावाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते. तिला ब्रिजेशसोबत लग्न करायचे होते. पण ब्रिजेशचे राजपूत कुटुंब मुस्लिम मुलीशी लग्न करायला तयार नव्हते. शबरीनने […]
अधिक वाचा...खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले
पुणे : सुरुवातीच्या वृत्तानुसार, गट तलावात शिरला, त्यादरम्यान ओजस आणि राज गाळात अडकले. मुळशी तालुक्यातील खांबोली गावात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओजस आनंद कठापूरकर (२२, रा. निगडी प्राधिकरण) आणि राज संभाजी पाटील (२२, रा. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत […]
अधिक वाचा...हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…
रायगड : पिंपरी-चिंचवड येथील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली. यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. शिवाय, त्यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली आहे. कोकणात श्री […]
अधिक वाचा...मनोधैर्य योजना! ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…
पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित युवतीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईनचा शतक मोहोत्सव!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईन शताब्दी मोहोत्सव समिती, पुणे चे वतीने सोमवार पेठ पोलिस लाईन शतक मोहोत्सव आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, चंद्रकांत उर्फ चंदू बोर्डे माजी क्रिकेट कप्तान भारत टिम हे उपस्थित राहणार आहेत. सोमवार पेठ […]
अधिक वाचा...
