गुन्हे शाखा युनिट ६ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणीकाळभोर व पेरणे ते डोंगरगाव रोडवर येथे गुन्हे शाखा युनिट ६ने अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई केली. मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे २१/१०/२०२४ रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषिकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, पेरणे ते डोंगरगाव रोडवर एक महिला भट्टी लावून दारू तयार करीत आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी टिमने अचानकपणे छापा घातला असता महिला शितल गणेश परदेशी (वय २३ रा. मोलाई चौक, पेरणे, ता हवेली, जि पुणे) ही तिच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना मिळून आली. तिचे ताब्यात सुमारे १४० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व २५०० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,९८,००० रू किं चा मुद्देमाल मिळून आला आहे. तिचेविरुद्ध लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणीकाळभोर येथे महिला मंगल संगम आडगळे (वय ४५ रा. समतानगर, लोणी काळभोर, पुणे) हिचे ताब्यात एकूण ५७३०/- रु कि चे ३५ लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला आहे. तिचेविरुद्ध लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी शैलेश बलकवडे अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे पोलिस उपायुक्त, गुन्हे, राजेंद्र मुळीक सहा पोलिस आयुक्त २ यांचे मार्गदर्शनाखाली वाहीद पठाण वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर, संभाजी सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.

पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…

मनोधैर्य योजना! ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!