येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष भरत जाधव कारागृहातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल झाला आहे.
येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे येथील बंदी क्र. सी-949 आशिष भरत जाधव याने सोमवारी (ता. २०) दुपारी खुले कारागृहाचे अभिरक्षेतुन अनधिकृतपणे पलायन केले होते. याबाबत येरवडा पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 224 अंतर्गत गु.र.नं. 775/2023 अन्वये बंदीवर कारागृहामार्फत पलायनाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंदीचा शोध घेणेकामी त्याचे नातेवाईकांशी संपर्क साधला असता, बंदीचे आईस हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. यावरुन बंदी जाधव याने त्याचे आईचे काळजीपोटी कारागृहातुन पलायन केले होते.
आज (बुधवार) सकाळी 7.30 वाजताचे दरम्यान बंदीचे आई-वडील यांनी बंदी आशिष जाधव यास घेऊन स्वतः कारागृहात हजर करणेकरीता घेऊन आले. त्यावेळी कारागृहाबाहेरील प्रतिक्षालयामध्ये बंदी व त्यांचे नातेवाईकांना थांबविण्यात आले. नियमानुसार सदर बंदीस ताब्यात घेणेबाबत तात्काळ येरवडा पोलिस स्टेशन येथे कळविण्यात आले असता, येरवडा पोलिस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत घेऊन बंदीस सुमारे 7.50 वाजताचे दरम्यान उक्त पलायन गुन्हयाचे तपासकामी येरवडा पोलिस स्टेशन यांनी ताब्यात घेतले आहे.
येरवडा खुले जिल्हा कारागृह ही किमान सुरक्षा असलेली शासकीय संस्था आहे तरी येथून सदरचे निघून जाणे कठिण नाही. प्राथमिक दृष्टया बंद्यास आईची काळजी वाटली व त्यातूनच कृत्य घडलेले असावे. आपल्या आईचे कुशलक्षेम बघून बंदी स्वतः हुन कारागृहात दाखल झाला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा खुले जिल्हा कारागृह या वेगवेगळया शासकीय संस्था आहेत. बंद्याने येरवडा खुले जिल्हा कारागृह येथून पलायन केले होते. येरवडा मध्यवर्ती कारागृह येथून नव्हते.
दरम्यान, २००८ साली वारजे पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आशिष जाधवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ३०२ च्या आरोपाखाली त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!