
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचे कारनामे पुढे येताना दिसत आहेत. वाल्मीक कराड याचा एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे.
दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मीक कराड याने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आले आहे. ही धमकी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागले असून, त्याची तपासणी केली जात आहे.
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वाल्मीक कराड याने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावेळी विष्णूने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले होते. यावेळी बोलताना वाल्मीक कराडने सुदर्शनने सांगितले आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता.
वाल्मीक कराड संपत्ती…
वाल्मीक कराड याला 2022 मध्येच ईडीची नोटीस आली होती. वॉचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डर पुण्यात असून एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला सात शॉप आहेत. त्या एका शॉपची किंमत पाच कोटी आहे. विष्णू चाटेची बहीण, आकाची दुसरी पत्नी आणि वाल्मिक आकाच्या नावावर शॉप आहे. हे 40 कोटींचे शॉप आहे. त्या बिल्डरची भेट घेऊन आलो, विचारलं आमच्या आकाला काय काय दिले? आकाने 35 कोटींचे टेरिस मागितले होते. मगरपट्टा येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि हा फ्लॅट कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे, ज्याची किंमत 75 कोटी आहे. ड्राव्हरकडून आकाने राहण्यासाठी करार देखील करून ठेवले, असा सनसनाटी दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पुण्यात 100 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

