पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका मोटारीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली असताना हडपसरमध्ये 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हडपसर रोडवर नाकाबंदीच्या काळात दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल 22 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हडपसर-सोलापूर रोडवर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका मोटारीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. ही रक्कम किराणामाल दुकानाची होलसेल व्यापाऱ्याचे बिल आहे, असे सांगण्यात येत आहे. याबाबतचा पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

दरम्यान, खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटी सापडले होते. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावा पुणे ग्रामीणचे एसपी पंकज देशमुख यांनी केला आहे. सोमवारी खेड-शिवापूर नाकाबंदीत जप्त केलेली रोकड नियमानुसार आम्ही आयकर विभागाला हस्तांतरित केली असून पुढील कारवाई सुरू आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!