
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायमुर्तींनी विचारले पोलिसांना अनेक प्रश्न…
मुंबईः बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी पार पडली असून या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
अक्षय शिंदे याला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलिस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
अक्षय शिंदे याने पोलिस वाहनात पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. याबाबत न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो”, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना सुनावले.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
न्यायमूर्ती मोहिते डेरे – मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी केव्हा नेला? त्याचा व्हिडिओग्राफ आहे का? मृत्यूचं नेमकं कारण काय? अक्षयला आणि ऑफिसरला नेमकी कोठे दुखापत झाली?
सरकारी वकील – मृतदेह सकाळी ८ वाजता जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. डोक्यात आरपार गोळी गेली होती. पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी छेदून गेली.
न्यायमूर्ती चव्हाण – फॉरेन्सिक चाचणी झाली का? ते कोणतं शस्त्र होतं? पिस्तुल लोड झाली होती का? त्याला पिस्तुल लोड करता येत होती का?
सरकारी वकील – झटापटीत ती पिस्तुल लोड झाली.
न्यायमूर्ती चव्हाण – “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो.
एवढा निष्काळजीपणा का…
गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.
दोन गोळ्या कुठे गेल्या…
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. अशाही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.
अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही?
त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असंही न्यायमूर्ती म्हणाले.
जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल द्या
याप्रकरणातील जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसेच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसेच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, पोलिसांचे वाहन चालवलेल्या ड्रायव्हर, माजी अधिकारी यांचीही चौकशी करण्याचे आणि कॉले डेटा रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असे तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असेही न्यायमूर्तींनी विचारले. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. याप्रकरणी पुढच्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.
बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…
बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…
बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…
बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…
Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…
बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…
बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

