बिहारचे दबंग ips अधिकारी शिवदीप लांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार…

पाटणा (बिहार): बिहारचे दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी (ता. १९) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिहार पोलिस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी तडकाफडकी पोलिस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.

शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती पुढे येत आहे. येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृ्त्त पोलिस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करु शकतात. यामध्ये शिवदीप लांडे यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. शिवदीप लांडे यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाच्या तिकीटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात. बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे.

शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.

राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की…
प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…

राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या; पाहा यादी…

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!