
प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत ३० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका महिला पोलिस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक राजगड जिल्ह्यात घडली आहे.
राजगड येथील पोलिस उप निरीक्षक दीपांकर गौतम यांच्या हत्ये मागे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर महिला शिपायी पल्लवी सोलंकी असल्याचे समोर आले आहे. पल्लवी सोलंकी आणि तिचा बॉयफ्रेंड करण ठाकूर या दोघांनी मिळून पोलिस उप निरीक्षका दीपांकर गौतम यांची हत्या केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. लव ट्रॅंगलमध्ये दीपांकर गौतम अडसर ठरत असल्याने त्यांच्या महिला पोलिस शिपायाने काटा काढल्याचे उघड झाले आहे.
महिला शिपाई पल्लवी आणि तिचा प्रियकर किरण यांनी पोलिस उप निरीक्षका दीपांकर गौतम यांना महामार्गावर फोन करून बोलावून घेतले. तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते दुचाकीवर बसले आणि निघाले होते. यावेळी पाठीमागून कारने त्यांना जोरदार धडक दिली. दीपांकर यांना त्यांनी तसेच फरफटत तीस मीटरपर्यंत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षका दीपांकर गंभीर जखमी झाले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे दोघेही देहात पोलिस ठाण्यात आले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
पल्लवी सोलंकी आणि प्रियकर करण हे लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये एकत्र राहात होते. परंतू दोघांमध्ये नंतर काही कारणाने भांडण झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. देहात पोलिस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर पल्लवी हीचे पोलिस उप निरीक्षका दीपांकर गौतम यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, काही दिवसानंतर तिचा प्रियकर किरण तिच्या आयुष्यात पुन्हा आला. त्यानंतर पल्लवी पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. याचा दीपांकर गौतम याला राग आला. त्यानंतर त्याने किरणला भेटू नकोस असे सांगितले होते. प्रेमाच्या त्रिकोणातून पोलिस उप निरीक्षकाला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…
महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…
Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

