नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

नागपूर : नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी धनीराम वासनिक (वय ५५) याला बेड्या ठोकल्या आहेत. चल तुला चॉकलेट देतो, असे सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी घाबरली आणि तिथून निघून आली.

घाबरलेल्या पीडिते मुलीने सर्वात प्रथम आपलं घर गाठलं आणि त्यानंतर सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईनं तात्काळ पोलिस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी पोलिस कोठडीत असून त्याचा कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!