
घाटंजी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : ” सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,
आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जाऊया.” राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर (यवतमाळ) व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायालय क्रंमाक 1 चे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांच्या हस्ते घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन होणार आहे. या वेळी न्यायालय क्रंमाक 2 चे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर उपस्थित राहणार आहे. तसेच घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. निलेश चवरडोल, माजी अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, ॲड. सादीक खान, ॲड. चंद्रकांत मरगडे या सह घाटंजी तालुक्यातील अधिवक्ता (ADVOCATE) उपस्थित राहणार आहे. घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीत घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक
संदीप नरसाळे, कोर्ट मोहरर घाटंजी व पारवा आदीं पोलिस स्टाफ न्यायालयीन कामकाजात मदत व सहकार्य करणार आहे.
खालील प्रकारची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवता येतील.
दाखल पुर्व प्रकरणे: निगेशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट च्या कलम 138 खाली दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे, बॅक वसुली प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, इतर फौजदारी तडजोडपात्र, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे, पैसे वसुलीची प्रकरणे आदीं प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायाधीश, तज्ञ वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ आपणास मदत करणार आहे. तसेच या वेळी कोणत्याही प्रकारची फी वगैरे भरावी लागणार नाही. तसेच लोक न्यायालयाच्या निवाडया विरुद्ध अपील नाही.
सबब, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहून लोक अदालतीत लाभ घ्यावा, असे आवाहन घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायालय क्रंमाक 1 चे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी केले आहे.

