पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. या सुनावणीत युपीएससीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करत तिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकरला चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक असून तिला जामीन देणे योग्य नाही असे युपीएससीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला असून तिच्या अटकपूर्व जामिनाची तारीख वाढवली आहे.

युपीएससीकडून प्रतिज्ञापत्रात म्हटले की, पूजा खेडकरने बनावट कागदपत्रांच्या आधारे २०२२ च्या आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कुणाची मदत घेतली हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. त्यासाठी तिला अटक करावी लागेल. या प्रकरणी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी चौकशीची गरज आहे. पूजा खेडकर हिच्या अटकेनंतर आणि चौकशीनंतरच यातील सत्य समोर येईल.

दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाची तारीख २९ ऑगस्टपर्यंत वाढवली. पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, युपीएससीने २० ऑगस्टला त्यांच्या प्रतिज्ञापत्रात प्रतिसाद दिला आहे. त्यामळे त्याचा अभ्यास करायला वेळ हवा आहे. पुढच्या सुनावणीत आता पूजा खेडकरला जामीन मिळणार की अटक होईल हे स्पष्ट होणार आहे.

बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!