
पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…
मुंबईः ‘राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता यापुढे अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या आणखी पुढे गेल्या तर अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतो. मात्र, त्या उमेदवाराला ती संधी मिळायला हवी,’ असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पण, यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. राज्यभरात थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून याचा पोलिस भरतीवर परिणाम झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलिस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे. तसेच पावसामुळे पोलिस भरतीवेळी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. राज्यात सध्या काही जिल्ह्यांत पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असल्याने अशा वातावरणात भरती प्रक्रिया राबवणे योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. दरम्यान फडणवीसांनी यावर भाष्य केले आहे.
फडणवीस म्हणाले, ‘पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असून, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही तिथे चाचण्या होत आहेत. तसेच पोलिस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. राहण्याची जागा नसल्याने ही मुले आपल्याला बस स्टॅण्डवर वैगेरे दिसत आहेत. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना केले आहे.’
बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…
पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…
महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…
मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…
महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

