
भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…
नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत आठ भाविकांचा होरपळून मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सुमारे 60 जण प्रवास करत होते.
सर्व भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते आणि बनारस आणि वृंदावन येथून परतत होते. याच दरम्यान हा अपघात झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. शिवाय, स्थानिक नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येईपर्यंत बसमधील अनेक भाविक होरपळले होते.
बसमधील प्रवासी असलेल्या सरोज पुंज आणि पूनम या पीडित भाविकांनी सांगितले की, ‘एक बस भाड्यानं घेतली होती. या बसमधून सर्व भाविक बनारस आणि मथुरा वृंदावनला भेट देण्यासाठी गेले होते. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 60 जण होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक होते, जे पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवार-शनिवारी रात्री दर्शन घेऊन ते परतत होते. रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्या बसमधून बाहेर आल्या.’
VIDEO | At least eight people were killed when the bus they were travelling in caught fire on the Kundli-Manesar-Palwal (KMP) Expressway near Nuh, #Haryana, late on Friday.
(Source: Third Party) pic.twitter.com/xeE7XkhBGD
— Press Trust of India (@PTI_News) May 18, 2024
हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…
Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…
बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

