Video: रशियामध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार…

मॉस्को (रशिया): मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार झाले असून, दीडशे जण जखमी झाले आहेत. मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) शुक्रवारी (ता. २२) संध्याकाळी गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे.

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो नागरिक उपस्थित होते. त्यावेळी अचानक सहा ते सात हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, यामध्ये दीडशेहून अधिकजण जखमी झाले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडीओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो. एका व्हिडीओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत.

रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!