प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

पाटणा (बिहार): प्रेमविवाह झाल्यानंतर गावातील एका युवकाच्या प्रेमात महिला पडली होती. शिवाय, तिला रिल्स बनविण्याची आवड होती. पतीने रिल्स बनविण्यापासून रोखल्यामुळे पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महेश्वर राय याची पत्नी राणी आणि तिच्या प्रियकरासह २ साथीदारांना अटक केली आहे.

महेश्वर आणि राणी या दोघांचा ६-७ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहानंतर महेश्वर कामाच्या निमित्ताने कोलकाता येथे राहात होता. तर गावाकडे सासरी राणी राहात होती. दरम्यानच्या काळात राणीचे एका युवकासोबत प्रेमसंबध सुरू झाले. हा प्रकार सासरच्यांना कळाल्यानंतर घरात वाद सुरू झाले. त्यानंतर राणी तिच्या माहेरी राहून इन्स्टाग्रामवर रिल्स बनवू लागली. इन्स्टावर रिल्स बनवल्यानं ती फेमस झाली आणि तीची मैत्री अन्य मुलांसोबत होऊ लागली. त्यानंतर राणी त्या मुलांसोबत चॅटिंग करत होती. या गोष्टीने राणीचा पती महेश्वर नाराज होता.

महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या सासरी पोहचला होता. पण, त्यानंतर रविवारी महेश्वरचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. महेश्वर सासरी गेल्यानंतर तिथे त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. पत्नी राणीने तिचा प्रियकर आणि २ बहिणी रोजी कुमारी, सुनीता कुमारी यांच्यासोबत मिळून महेश्वरच्या हत्येचा कट रचला. पत्नीने महेश्वरला फोन करून घरी बोलावले त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. मृत महेश्वरच्या कुटुंबाने यात सून राणीवर आरोप केला आहे. पत्नी राणी कुमारी टिकटॉक आणि रिल्स बनवण्याचा विरोध केल्यावर पत्नी आणि सासरच्यांनी महेश्वरला मारून टाकले असा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी महेश्वरची पत्नी राणी, तिचा प्रियकर आणि २ बहिणींना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!