
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय…
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत दाखल असलेल्या याचिकेवर आज हायकोर्टाने आपला निकाल सुनावला. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर निकाल देताना सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात जबाब नोंदवावेत आणि सीबीआयने तपासाला सुरुवात करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, त्याच वेळेस जबाब नोंदवताना सीबीआयने कोणालाही आरोपी असल्यासारखी वागणूक देऊ नये अशीही सूचना केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवण्यात आली होती. दिशा सालियान यांच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करावी, यासाठी याचिका दाखल केली होती. दिशा सालियानच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. हायकोर्टाने आजच्या निकालात महत्त्वाचे निर्देश दिले. या प्रकरणाची नोंद असलेल्या आणि तपास केलेल्या मालवणी पोलिसांनी या प्रकरणाची सगळी कागदपत्रे, पुरावे सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. तर, या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास करण्यास हायकोर्टाने सांगितले.
View this post on Instagram
दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता आणि दिशाने आत्महत्याच केली असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, मार्च २०२५ मध्ये दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.
निकालानंतर सतीश सालियान यांच्या वकिलांनी सांगितले की, पुराव्यांवरून ज्यांचे नाव समोर येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांच्याविरुद्ध पुरावा नसेल, त्यांना आरोपी केलं जाणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय या प्रकरणात सीबीआयने प्रतिकूल तपास अहवाल सादर केल्यास त्यावर आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार राहणार असल्याचे आदेश कोर्टाने दिले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
दिशा सालियान हिच्या लॅपटॉपमध्ये मिळाला महत्त्वाचा डेटा…
दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…
अंकित बलियान हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशात एन्काउंटर; दोन मुख्य मारेकरी ठार

