
मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन हद्दीमधील फहीम फिरोज खान ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर २ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९८ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
दिनांक १२/११/२०२३ रोजी रात्रौ ११/०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे जण दिवाळी सन असल्यामुळे गिरधरे याचे दुकाना समोर फटाकडे फोडत होते. सदर ठिकाणी फहीम फिरोज खान त्याचे सहकारी शाहरुख शेख व एक विधीसंघर्षीत बालक असे फिर्यादी यांच्याकडे गेले आणि ‘तुझी गल्ली सोडून इकडे फटाकडे उडवायला का आलास?’ असे म्हणुन शिवीगाळ करू लागले. फिर्यादी यांनी शिव्या का देतोस, दिवाळीला फटाकडे नाही उडवाचे तर काय करायचे असे म्हटल्याचे कारणावरून फहीम खान याने तुला जास्त बोलायला येते, आज याचा काटा काढुन टाकू असे बोलुन शाहरूख शेख याने त्याचे कमरेतुन लोखंडी हत्यार काढुन, तुला तर आज जिवंत सोडत नाही असे म्हणून फिर्यादी यांना जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यावर लोखंडी हत्याराने मारून जखमी केले. त्याचवेळी फहीम खानने त्याचे कमरेला लावलेले धारधार हत्यार काढून फिर्यादी यांचे मित्राचे डोक्यावर वार केला.
विधीसंघर्षीत बालकाने त्याचे हातातील हत्यार हवेत फिरवुन, शाहरूख भाई और फय्युम भाई जैसा कहते है वैसाच करणे का, फटाके नही फोडने का तो नही फोडने का असे धमकावून गल्लीतील लोकांचे अंगावर धावुन जावून सदर परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मार्केटयार्ड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.२७५ / २०२३, भा.द.वि. कलम ३०७, ३२३,३२४,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५),मपोकाक ३७(१) १३५, क्रिमीनल अमेंडमेंन्ट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
दाखल गुन्हयांचे तपासा दरम्यान आरोपी
१ ) फहीम फिरोज खान, वय २१ वर्षे, रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे ( टोळी प्रमुख)
२) शाहरुख सलीम शेख, वय २१, रा. गल्ली नं. १५, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे (टोळी सदस्य ) आ.क्र.१ व २ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून, ते सद्या येरवडा जेल पुणे येथे आहेत.
३) एक विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे.
नमुद आरोपी फहीम फिरोज खान (टोळी प्रमुख) याने टोळीमधील वरील सदस्यांना बरोबर घेवून दखलपात्र गुन्हा करुन, टोळीची दहशत व वर्चस्व निर्माण करुन, त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने बेकायदेशीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, जाळपोळ करणे, दरोडा या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. यातील नमुद आरोपी यांचेविरुध्द वेळोवेळो प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील
त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२) ३ (४) प्रमाणे अंतर्भाव करणेकामी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलिस स्टेशन, पुणे शहर, सुरेशसिंग गौड यांनी पोलिस उपआयुक्त, परिमंडळ – ०५, पुणे शहर, आर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करून मार्केटयार्ड पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्र. २७५/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,३२४,५०४,५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोकाक ३७(१) १३५, क्रिमीनल अमेंडमेंन्ट अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii).३(२).३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर, शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार पोलिस सह आयुक्त, अतिरिक्त कार्यभार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे, रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, मा. पोलिस उपआयुक्त परिमंडळ – ०५, पुणे शहर, आर राजा, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), स्वप्नाली शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक, कैलास डाबेराव, पोलिस उपनिरीक्षक, चेतन भोसले, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलिस अंमलदार, अमरनाथ लोणकर, चव्हाण यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ९८वी कारवाई आहे.

मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…
मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…
मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

