सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…

सांगली: शिराळा तालुक्यातील प्रेमविवाह केलेल्या एका युवतीने सासरच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे.

पूजा शिवम पाटील (वय २४, रा. पाडळी, ता. शिराळा) असे मृत विवाहित युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय ५७, रा. शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. शिवम सुरेश पाटील (पती), सुमित्रा सुरेश पाटील (सासू) आणि सुरेश खंदू पाटील (सासरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिने शिवम पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांपासून म्हणजेच ७ जून २०२३ पासूनच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. “लग्नात योग्य मानपान केला नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण,” असा सततचा दबाव तिच्यावर टाकला जात होता. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला वैतागून पूजा हिने २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. या भीषण आगीत ती गंभीरपणे भाजली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

वडिलांच्या फिर्यादीवरून शिराळा पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…

पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…

पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…

पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!