हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीने मुलासह संपवलं जीवन, चिठ्ठी वाचून मन सुन्न…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात असलेल्या वाकडमधील डांगे चौक परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून खाली उडी मारून विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्यासह शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी आत्महत्या केली. मायलेकाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहितेनं मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात तिने आजारपणाचा उल्लेख केला आहे. तसेच आपल्या मृत्यूनंतर मुलाला आपली आठवण येत राहिली असती, त्यामुळे त्यालाही सोबत घेऊन जात आहे, असे महिलेनं चिठ्ठीत नमूद केले आहे. ही नोट समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता मनोज भांगड (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. माधव मनोज भांगड (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. डांगे चौकाजवळील ‘सिग्नेचर पार्क’ या सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. एकता भांगड या गृहिणी होत्या, तर त्यांचे पती येरवडा येथील एका प्रतिष्ठित IT कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे मूळचे राजस्थानचे कुटुंब मागील दोन वर्षांपासून या इमारतीत वास्तव्यास होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एकता भांगड या आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. काही वेळातच इमारतीच्या डक्टमधून मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी एकता आणि तिचा लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडल्याचं स्थानिकांना दिसून आले. ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने वाकड पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आपल्या पोलिस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली.

चिठ्ठीमध्ये महिलेने आपण बऱ्याच दिवसांपासून गंभीर आजारपणाने त्रस्त असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, “माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाला माझी खूप आठवण येईल, त्यामुळे मी त्यालाही माझ्यासोबत घेऊन जात आहे,” असा अतिशय भावनिक उल्लेख त्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलिस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

हृदयद्रावक! जळगावमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू…

हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…

हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…

हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…

हृदयद्रावक! बहिणीकडून राखी बांधल्यानंतर भावाने संपवले जीवन; भावनिक मेसेज व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!