पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…

पुणे : सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर एका बंद कारमध्ये साधारण युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी बेवारस अवस्थेत उभी होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी वाहन गेल्या दोन-तीन दिवसांपासून उभे होते. संबंधित कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. नागरिकांनी तात्काळ यासंदर्भात खडक पोलिस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडून पाहिला असता, आतील सीटवर एका तरुणाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह दोन दिवसांपासून बंद कारमध्ये असल्यामुळे त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मृत व्यक्तीची ओळख पटलेली असून शुभम बनसोडे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. काळेपडळ हद्दीतून तरुण बेपत्ता होता. मृत तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कार येथे कोणी उभी केली आणि मृत व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेत आहेत.

पुणे! आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हृदयविकाराचा झटका…

पुणे! युवतीसोबत कात्रज परिसरात घडला धक्कादायक प्रकार…

पुणे! विद्यार्थ्याने नशेत भरधाव कार चालवत 4 वाहनांना उडवलं; धक्कादायक Video…

पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…

पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!