वर्क फ्रॉम होम असलेल्या अविवाहित IT इंजिनियर मुलाने केली आईची हत्या…

अमरावती: एका आयटी इंजिनियर मुलाने स्वतःच्या आईचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून हत्येनंतर आरोपी मुलगा घरातच थांबला होता. किरकोळ वादातून आई आणि मुलगा तुषार यांच्यात भांडणं झाली होती.

रंजना कानफाडे (वय ६०) असे मृत महिलेचं नाव असून तुषार सतीश कानफाडे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तुषार हा आयटी इंजिनियर असून तो अविवाहित होता. आयटी कंपनीत तो चांगल्या पगारावर देखील होता. वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळं तो अमरावतीतूनच काम करायचा. आई आणि मुलगा असे दोघंच घरात राहत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दोघांमध्ये वाद पेटला. संतापाच्या भरात तुषारनं आईचा गळा आवळला. आईचा या घटनेत मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर तुषार तिथंच बसून राहिला. नंतर त्याने गाडगे नगर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. ‘मी माझ्या आईचा खून केला’, अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आईचा मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणात गाडगे नगर पोलिसांनी तुषार कानफाडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…

नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…

धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…

मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!