
पोलिस कर्मचाऱ्याने घरात घेतला गळफास; पोलिस दलात खळबळ…
मुंबई : आझाद मैदान पोलिस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या एका पोलिस शिपायाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. किशोर म्हस्के असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
किशोर म्हस्के हे घाटकोपर शहरातील पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या सरकारी पोलिस वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मात्र मंगळवारी त्यांनी घरातच टोकाचे पाऊल उचलल्याचे उघडकीस आले. नंतर या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
सध्या घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. मात्र किशोर म्हस्के यांनी इतका मोठा निर्णय का घेतला किंवा त्यांच्या आत्महत्येमागील कौटुंबिक वाद का कामाचा ताण की अन्य काही कारण आहे आहे का? या सर्वांचा पोलिस तपास करत आहे. या घटनेत पोलिसांना कोणतहीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय असेल ते अद्याप समजले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

