पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामतीतील सूर्यनगरीत अविष्कार ढोले (वय १९) या युवकाने डोक्यात रिवॉल्वर मधून गोळी झाडून घेतली आहे. युवकाचा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.

युवक शिक्षणासाठी बारामतीतील सूर्यनगरीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. याच अपार्टमेंट मध्येच डोक्यात रिवॉल्वर मधून गोळी झाडून घेतली आहे. त्याच्याकडे रिवॉल्वर कुठून आला याची सर्व माहिती पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास बारामती तालुका पोलिस करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळल्याने बारामतीत युवकाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. युवकाचा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची घटना घडली. अविष्कार अमोल ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या दरम्यान सूर्यनगरी येथील जयश्री अपार्टमेंटमध्ये अविष्कार याने स्वतःकडील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी प्रथम बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. अविष्कार याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला झाल्याने त्याला मानसिक तणाव आला होता त्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, त्याच्याकडे पिस्तुल कुठून आले, तसेच या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा बारामती तालुका पोलिस तपास करत आहेत.

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू…

बारामती! भावकीच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या…

बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…

महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!