
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू…
अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात आज (सोमवार) पहाटे भीषण आग लागली. त्यामध्ये तीन लहान बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर या कक्षात असलेल्या सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. या कक्षात एकूण 9 बालके होती. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर / नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. दरम्यान, अवघ्या वर्षभरापूर्वी हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला होता. मग आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
View this post on Instagram
आगीत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बाळांच्या आई-वडिलांचे नाव पुढीलप्रमाणे…
1) पूजा बोरगे यांचा मुलगा (रा. पुलगाव, वर्धा)
2) गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा (रा. मुरखेड, तालुका अंजनगाव सुरजी)
3) किरण बेठेकर यांची मुलगी (रा. बोराळा तालुका चिखलदरा)
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर दोन परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे या कक्षात असलेल्या सहा बाळांचा जीव वाचल्याची माहिती आता समोर येत आहे. या दोन परिचारिकांनी इवल्याशा बाळांसाठी अक्षरश: स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या बाळांचा जीव वाचवला. त्यांनी म्हटले की, आम्हाला समोर फक्त लहान मुलं दिसत होती. आग खूपच भीषण होती. मात्र, आम्ही आम्हाला काय होईल याचा विचार केला नाही. आम्ही या कक्षात ठेवण्यात आलेल्या पेटीतील बाळांना बाहेर काढले. आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, या कक्षात आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. आम्हाला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तीन बाळांना वाचवता आले नाही. बाळांना वाचवताना आगीमुळे आमचे हात भाजले. या परिचारिकांनी त्यांचे भाजलेले हात बोलताना कॅमेऱ्यासमोर दाखवले.
ही आग इतकी भीषण होती की, नवजात बालकांच्या कक्षात असलेले एसी आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, स्त्री जिल्हा रुग्णालयाची ही नवीन इमारत बांधून अवघ्या वर्षभरापूर्वी हे रुग्णालय सुरु झाले होते. तरीही आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Amravati, Maharashtra: Three newborns died after a fire broke out in the Neonatal Intensive Care Unit (NICU) of Amravati District Women’s Hospital at around 3:30 AM. The fire reportedly started following an explosion in a ventilator on the hospital’s third floor, where 39… pic.twitter.com/Yde1uEk3W6
— IANS (@ians_india) August 24, 2026
रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

