फेर मतदान! मारकडवाडी गावातील ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल; पाहा नावे…

सोलापूर : मारकडवाडी (ता. माळशिरस) गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आले असून, ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे…
1) संजय हरिभाऊ वाघमोडे
2) राजेद्र अंकुश मारकड
3) वैभव वाघमोडे
4) विजय वाघमोडे
5) विलास आद्रट
6) रणजित जिजाबा मारकड
7) लक्ष्मण सिताराम मारकड
(8) सर्जेराव बाबुराव लोखंडे
(9) संदिपान आण्णा मारकड
10) अमित वाघमोडे
11) दत्तु राघु दडस
12) आबा नाना मारकड
13) बबन दादा वाघमोडे
14) मारुती शंकर रणदिवे
15) नानासाहेब मारकड
16) संजय नरळे
17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी.
18) इतर 100 ते 200 लोक

दरम्यान, मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचे एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झाले १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली.

मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक; पाहा नावे…

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!