
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं अन्…
मुंबई: कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात राहात असलेल्या आणि नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (ता. १५) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नौदल कर्मचाऱ्याच्या राहत्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय आला आणि त्यानंतर या भीषण प्रकाराचा उलगडा झाला. परंतु, या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, पतीनेच आधी पत्नी आणि मुलांना विष देऊन नंतर स्वतः गळफास घेतला का? याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे. या कौटुंबिक सामूहिक आत्महत्येमागे नक्की काय कारण होते? कौटुंबिक कलह, मानसिक ताणतणाव की अन्य काही आर्थिक किंवा वैयक्तिक अडचण होती, या सर्व शक्यतांचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी या चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे. नौदलाच्या कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांना विष देऊन मारल्यानंतर आत्महत्या केली, असावी असा अंदाज आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण आणि घटनाक्रम शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, “नेव्ही नगर, कुलाबा येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलातील एका नौसैनिकासह त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेचा पोलीस तपास सुरू असून, भारतीय नौदलाकडून तपासासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.”, असे निवेदन भारतीय नौदलाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या भीषण अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू…
पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पोलिस अधिकारी संतोष केंद्रे यांची चपळाई; बादल कुटुंबियांकडून रोख बक्षीस जाहीर…
लग्नाला काही महिने बाकी असतानाच युवक-युवतीचा आढळला मृतदेह…
धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…

