
Video: पिंपरी-चिंचवडमधील बावधन येथे जमिनीच्या ताब्यावरून तणाव आणि गोळीबार…
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील बावधन परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर जमिनीच्या ताब्यावरून तणाव निर्माण झाल्याची घटना रात्री पावणे एकच्या सुमारास घडली. शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदेरे यांनी संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
View this post on Instagram
घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारातील काही हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. यावेळी एका व्यक्तीकडून कंबरेचे पिस्तूल लोड करतानाचे दृश्य दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय, संबंधित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर कामगाराच्या दिशेने एक राऊंड गोळीबार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबारासारखा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गोळीबार नेमका झाला का आणि त्यामागील परिस्थिती काय होती, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल शहानिशा सुरू असून, तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे बावधन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत पुढील तपास सुरू केला आहे.
पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…
पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…

