
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…
ठाणे : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना आज (शनिवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठ्या पोलिस बंदोबस्तात गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी कायम राहणार आहे. हल्ल्याचा कट पुर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपींचा शोध घ्यायचा आहे. या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करायचा आहे. गायकवाड यांच्यावर याआधीही 5 गुन्हे दाखल आहे. गायकवाड यांची बंदुक जप्त केली आहे. फरार 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. पण प्रकरणाची गंभीरता आणि CCTV फुटेजच्या आधारे कोर्टाने आमदार गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे.
गोळीबारप्रकरणी उल्हासनगर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करणार असल्याचे सागंण्यात आले होते. पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता व्हीसीद्वारे हजर न करता प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोळीबार सीसीटीव्ही समोर…
हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…

