हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

बीड : लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येत असताना नवरदेवाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची बहीण आणि चिमुकल्या भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या युवकाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. युवकासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे नवरदेवाच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (ता. रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या युवकाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. सेवालालच्या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नातवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली.

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!