पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…

पुणे: पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारत जाणारी उपनगरे लक्षात घेता, गृहमंत्रालयाने पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत 5 नवीन पोलिस ठाणी निर्माण करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. 25 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या नवीन पोलिस ठाण्यांच्या भौगोलिक सीमाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

पाच नवीन पोलिस ठाणी आणि त्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे…
१) मांजरी पोलिस ठाणे: हडपसर आणि फुरसुंगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी आणि मुळा-मुठा नदीकाठचा भाग या ठाण्याच्या कक्षेत येईल.
२) लक्ष्मीनगर पोलिस ठाणे: येरवडा, शास्त्रीनगर, संगमवाडी आणि कल्याणीनगर या भागातील कायदा व सुव्यवस्था या नवीन ठाण्यामार्फत हाताळली जाईल.
३) नऱ्हे पोलिस ठाणे: नवले पूल, वडगाव खुर्द, सनसिटी आणि आंबेगाव या परिसरातील नागरिकांना आता नऱ्हे पोलिस ठाण्याचा आधार मिळेल.
४) लोहगाव पोलिस ठाणे: विमानतळ परिसर, धानोरी आणि वेगाने विकसित होणाऱ्या निवासी झोनवर या ठाण्याचे नियंत्रण असेल.
५) कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी ठाणे: मॅंगो वूड्स सोसायटी ते काळेपडल, तानाजी मालुसरे रोड, अंतुलेनगर, ट्रिनिटी कॉलेज आणि बोपदेव घाट माची ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भाग यात समाविष्ट असेल.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, संबंधित नवीन पोलिस ठाणी केवळ इमारतीपुरती मर्यादित नसून ती नियंत्रण कक्ष, पेट्रोलिंग नेटवर्क आणि क्राईम मॉनिटरिंग सिस्टिमशी तांत्रिकदृष्ट्या जोडली जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यास मदत होईल.

पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…

पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!