नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत रंगेहात पडकल्यानंतर पत्नीने पतीला संपवल्याची घटना सोनभद्र येथे घडली आहे. पोलिसांनी तपास करत चौघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

रामाशंकर मिश्रा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते शक्तीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिना कॉलनीमधील कंपनीच्या क्वार्टर्समध्ये त्यांची पत्नी प्रियांका आणि दोन मुलींसोबत राहत होते. प्रियांका आणि विकास चौहान यांचे प्रेमसंबंध होते. रामाशंकर कामासाठी बाहेर पडल्यानंतर विकास घरी येत असे. आणि नवरा घरी येईलपर्यंत तिच्याच घरी थांबत असे. रामाशंकर 22 ऑगस्ट रोजी नेहमीच्या वेळेच्या दोन तास आधी घरी परतला. पत्नी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. प्रियंका आणि विकास यांनी रामाशंकर यांचा गळा दाबून हत्या केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

विकासने त्याचे दोन साथीदार, अनुराग सिंग उर्फ ​​बादल आणि सोनू गुप्ता यांना बोलावले होते. मृतदेह एका चादरीत आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बिना स्टेडियम-जमशिला रस्त्याजवळ रस्त्याच्या कडेला चार जणांनी फेकून दिला. तो मृतदेह 23 ऑगस्ट रोजी सापडला. रामाशंकर यांना दीड लाख पगार होता, त्यांची अनुकंपाची नोकरी पत्नीला हवी होती, म्हणून त्यांनी हत्या नसून अपघात असल्याचे दाखवले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पण संशय आल्याने त्यांनी सर्वांची चौकशी केली. चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रियंका, विकास, अनुराग आणि सोनू यांची भूमिका समोर आली आहे. पोलिसांनी या चौघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…

मामी करायची भाच्यावर लैंगिक अत्याचार; रंगेहात पकडले अन्…

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!