
अक्कलकोटला निघालेल्या पाच भाविकांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी (ता. १७) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. अर्टिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ५ जणांचा जागीच अंत झाला, तर एक महिला या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. अपघातग्रस्त हे अक्कलकोटला दर्शनासाठी निघाल होते.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून अर्टिका कारने (क्र. MH-46 Z 4536) स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. रात्री ११:३० च्या सुमारास गाडी देवडी पाटीजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यापासून तब्बल १० ते १५ फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. ज्योती जयदास टाकले (वय ३७ वर्ष, सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या असून, सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातामुळे पनवेल परिसरात आणि मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
१) माला रवी साळवे, वय 40 वर्षे , पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
२) अर्चना तुकाराम भंडारे, वय 47 वर्षे, सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट
३) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे, आरबीआय एमएसओ रूम नंबर 8, रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल
४) अमर पाटील, खारघर
५) आनंद माळी
DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू…
Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू…

