निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…

पुणे : निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलिसांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, दिलीप आणि मनोरमा खेडकर पुण्यातील बंगल्यात फोन ठेवून फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आज (सोमवार) दुपारी खेडकर यांच्या घरी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

ऐरोलीमध्ये झालेल्या वाहन अपघातात एका व्यक्तीचे अपहरण करून आणून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी रबाळे पोलिस चौकशी करण्यासाठी पूजा खेडकरच्या घरी आले होते. पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना सरकारी काम करू दिले नाही. अपघातग्रस्त गाडी पळवून लावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज थेट गेटवर चढत घरात प्रवेश करून झाडाझडती घेतली. रबाळे पोलीसही यावेळी चौकशीसाठी आले होते.

रबाळे पोलिसांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी उघड अरेरावी केली असल्याचे समोर आले आहे. रबाळे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात पोहोचले. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

दरम्यान, नवी मुंबईत शनिवारी एक ट्रक मोटारीला घासल्याने वाद झाला. मोटार चालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याचे अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांचा बंगला गाठला. यावेळी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी मनोरमा खेडकर यांनी हुज्जत घातली. पोलिसांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांनी पोलिसांसोबत अरेरावीची भाषा केली. तसेच पोलिसांना चौकशी करता येऊ नये म्हणून त्यांनी पाळीव श्वानही बंगल्यात सोडले. त्यामुळे पोलिसांना चौकशीसाठी अडथळ निर्माण झाला होता.

पूजा खेडकरच्या बंगल्याच्या गेटवर चढून पोलिस शिरले घरात…

पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…

बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…

पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…

बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!