स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दु:खद प्रकार घडला होता. गेल्या अकरा दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ऐन गणेश विसर्जनाच्या काळात पीएसआय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला आहे.

खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. पाळू गावची कन्या अश्विनी केदारी ही 2023 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली होती. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

अश्विनी २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करायला उठली होती. अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली असता, हीटरचा शॉक लागून उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या भीषण अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली होती. तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने खेड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढे येऊन तिला आर्थिक मदत केली. मात्र, सर्वांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते. तिने त्या दिशेने जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु, नियतीने तिचा घात केला. तिचे कलेक्टर व्हायचे स्वप्न अपूर्णच राहिले. एका शेतकरी कुटुंबातून येऊन, जिद्दीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या अश्विनीच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अजित पवार यांना नडणाऱ्या IPS अंजली कृष्णा आहेत कोण…

मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन

पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी; PSI होण्याचा मार्ग मोकळा…

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; शासन निर्णय प्रसिद्ध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!