
पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन मंजूर…
घाटंजी-यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी बुधवारी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला. आरोपीची बाजू ॲड. ए. व्ही. चिरडे यांनी मांडली.
घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शिक्षक वसंत पत्रे विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात संबंधित शिक्षकाने ॲड. ए. व्ही. चिरडे यांच्या मार्फत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एस. बघेले यांच्या समक्ष झाली. आरोपीच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य ठरवून संशयित आरोपी शिक्षक वसंत पत्रे यांचा अटक पुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात अपराध क्रमाक ५८३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ७५ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ व १२ पोक्सो अंतर्गत संशयित आरोपी वसंत पत्रे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी खालील अटीवर व शर्तीवर अटक पुर्व जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपी शिक्षकाने प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता घाटंजी पोलिस ठाण्यात हजेरी देणे, संशयित आरोपी ने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच घाटंजी पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे, असे आदेश न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी दिले आहे.
बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले ‘सरप्राईज गिफ्ट’
पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…
प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…
कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…

