
पुणे! कोंढव्यातील पीडित युवतीने पोलिसांनाच केला उलट प्रश्न अन् अडकली…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या IT कंपनीत काम करणाऱ्या युवतीने बलात्कार प्रकरणातील सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ हा प्रत्यक्षात तिचाच मित्र निघाला. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. शिवाय, केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचे समोर आले आहे.
युवतीने केलेल्या आरोप आणि घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही. त्याचबरोबर, युवतीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही युवतीनेच एडीट करून लिहिल्याची कबुली दिली आहे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये प्रकरण पुर्णपणे उलटं फिरल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक देखील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करतो. तो गेल्या वर्षभरापासून युवतीच्या संपर्कामध्ये होता. दोघांची ओळख समाज मेळाव्यात झाली होती. त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता. तो तिच्या घरी येत-जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. शिवाय, तो अनेकदा तिच्या घरी ‘फूड डिलिव्हरी अॅप’वरून तिच्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.
घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत येताना दिसला आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी त्याचा फोटो तिला दाखवला असता युवतीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले होते. मात्र, ती काही वेळ स्तब्ध झाली. ‘तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला?’ असा प्रश्नही तिने पोलिसांना केला. ओळखत नाही, हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासात स्पष्ट झाले, की आरोपी युवक तिच्याच बोलावण्यावरून घरी आला होता.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणातील आरोपीचा युवकाचा छडा लावला. त्याचा फोटो शोधून काढला. वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी तरुणीला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास आले होते. यावेळी वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी तेथे उपस्थित होत्या. युवतीला फोटो ज्यावेळी पोलिसांनी दाखवला त्यावेळी दीड मिनिटे ती स्तब्ध झाली होती. तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला, असा प्रश्न तिने पोलिसांना केला. त्यानंतर हा तो व्यक्ती नाही, असे तिने सांगितले. एसीपी मुळीक यांच्या नजरेने तिचे खोटं बोलणं हेरले होतं. त्यानंतर आता अनेक गोष्टीचा खुलासा झाला आहे.
पोलिसांसमोर गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले होते. दिवस-रात्र 500 पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या युवकाला शोधून काढले. त्यासाठी कोंढव्यातील त्या सोसायटीच्या गेटपासून ते बाणेरपर्यंतच्या परिसरातील तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले होते. युवतीच्या घरी आलेल्या तिच्या मित्राचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच फोटोचा दुवा पकडून पोलिसांनी त्याला शोधून काढले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ज्या दिवशी तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला, त्या दिवशी तो युवक तिच्या सोसायटीत आल्याचे निष्पन्न झाले.
पुणे! कुरिअर बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला…
पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…
IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…
पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…
ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…
पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

