
पुण्यात तलावात सापडलेल्या मृतदेहाबाबत खुलासा; दिल्लीतून अटक…
पुणे: पुण्यातील बावधन परिसरात घडलेल्या एका खून प्रकरणाचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्यंत शिताफीने उलगडा केला आहे. केवळ २ हजार रुपयांच्या वादातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
खून केल्यानंतर थेट दिल्लीला पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गोपाल उर्फ राज साधोन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, मूळ पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
View this post on Instagram
बावधन येथून बेपत्ता झालेल्या महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, रा. लवळेवस्ती, मुळशी) या युवकाचा मृतदेह २ सप्टेंबर रोजी दुधाळे वस्ती परिसरातील तलावात संशयास्पद स्थितीत आढळला होता. महेंद्रकुमारच्या पायांना मोठे दगड बांधले होते तर हात टी-शर्टने बांधून त्याला तलावात फेकून दिले होते. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक मोलमजुरी करणाऱ्या कामगारांकडे केलेल्या चौकशीतून संशयित आरोपी गोपाल बिस्वास याचे नाव समोर आले. तपासादरम्यान आरोपी गुन्हा करून थेट दिल्लीला पळून गेल्याची पक्की माहिती मिळताच, पुणे पोलिसांच्या पथकाने थेट दिल्ली गाठली आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीने केवळ २ हजार रुपयांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून ही हत्या केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी दिली आहे.
रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…
पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…

