
पिंपरी-चिंचवड शहरातील ४७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे : राज्य पोलिस दलातील १५१२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३२ पोलिस उपनिरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
राज्याच्या विविध पोलिस घटकांमधून ६८ अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात आले असून त्यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, २२ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३४ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. याबाबत राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी मंगळवारी (ता. २७) आदेश दिले आहेत.
वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची ठाणे शहर येथे बदली झाली. पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, विश्वजित खुळे यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची, देवेंद्र चव्हाण यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर आणि सुनील पिंजण यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
पोलिस निरीक्षक महेश पाटील (मुंबई शहर), दत्तात्रय चासकर (राज्य पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई), राहुल सोनवणे (वर्धा), राजेंद्र पाटील (सिंधुदुर्ग), जगन्नाथ जानकर (नाशिक शहर), नरेंद्र ठाकरे (बुलढाणा), विजयानंद पाटील (पुणे शहर), संजय नरावाड (पुणे शहर), संजय सोळंके (यवतमाळ), दौलत जाधव (अहिल्यानगर), सुदाम पाचोरकर (एसीबी), महादेव कोळी (मुंबई शहर) यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली आहे.
शहर पोलिस दलातील नऊ सहायक पोलिस निरीक्षकांची बदली झाली आहे. तर सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत, श्रीराम शिंदे यांच्यासह २२ सहायक निरीक्षक शहरात आले आहेत. विविध कारणांमुळे चर्चेत असलेले पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे तसेच सोशल मीडियावरील एका गेम मध्ये करोडपती झालेले सोमनाथ झेंडे यांच्यासह ३२ उपनिरीक्षकांची बदली झाली आहे. ३० पोलिस उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत.
राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

