राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज (मंगळवार) जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश देण्यात आले आहेत. सध्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रविंद्र शिसवे हे या आधी मुंबईतील लोहमार्ग पोलिस आयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची बदली आता राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलिस सहआयुक्त निसार तांबोळी यांची बदली ही राज्य राखीव पोलिस दलाच्या महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली? पाहा…
रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
निसार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर
सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन

दरम्यान, वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची बदली करण्यात आली असली तरी ठिकाणी अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्यांच्या बदलीचे ठिकाण नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!