
खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलिस कर्मचाऱ्यांना भोवलं; तडकाफडकी निलंबन…
बीड: बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खोक्या भाईला पोलिसांकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला बीड पोलिसांनी जेलबाहेर आणल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणी आणि व्हिडीओत खोक्या बिनधास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओ सोमवारी दुपारी काढण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मिक कराड पाठोपाठ सतीश भोसले या गुंडाला बीड पोलिसांकडून शाही वागणूक दिली जात असल्याचे पोलिस दलाबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
यामध्ये इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहाबाहेर सतीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. त्याबरोबरच ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, खोक्या हा एखाद्या व्हिआयपी व्यक्तीच्या थाटात पोलिसांच्या कोंडाळ्यात उभा आहे. याठिकाणी खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिनधास्तपणे भेटताना दिसत आहेत. या भेटीगाठीसाठी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यावेळी खोक्या भाई बिनधास्त फोनवर बोलतानाही दिसत आहे. तो त्याच्या कार्यकर्त्यांना भेटताना दिसत आहे. बीड जाळपोळीच्या घटनेतील आरोपी अजिंक्य पवळ (काळे शर्ट) आणि इतर कार्यकर्त्यांचा (खाजगी लोकांचा) बिनधास्त वावर दिसत आहे. कारागृहाच्या आवारात खोक्या अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी जेवणाचे खास डब्बे आल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, गाठी, आणि मोकळ्या वातावरणाचा अस्वाद खोक्या घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपीची पोलिसांकडून इतकी शाही बडदास्त का? आणि कशासाठी? ठेवली जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…
खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…
धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…
खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…
बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

