इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…

घाटंजी (यवतमाळ) : इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन बोलत होता. पिडीते सोबत प्रेमाच्या आणाभाका झाल्यावर पिडीतेला यवतमाळच्या घरी भेटायला बोलाविले. कार्तीक कोहरेचे आई वडील मजुरीला गेल्यावर अल्पवयीन मुलीवर त्याच्या राहत्या घरी अत्याचार केला. आरोपी कार्तीक कोहरे हा नेहमी पिडीत मुलीला धमक्या देत असल्याने पिडीत मुलीने अखेर चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन आरोपी कार्तीक सुनील कोहरे विरुद्ध अत्याचार, माहिती तंत्रज्ञान कायदा व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, अत्याचार प्रकरणाचे घटनास्थळ यवतमाळ येत असल्याने सदरचा गुन्हा यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुजाता मनवर यांचे कडे देण्यात आला आहे.

हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!