वृद्ध व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; एका खोलीत घेऊन गेली अन्…

अहमदाबाद (गुजरात): सूरत येथील वराछा पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरणात एका महिलेसह 3 जणांना अटक केली आहे. या तिघांवर एका वृद्ध व्यक्तीकडून 1.15 लाख रुपये रोख आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा आरोप आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मनीषा, निलेश गोस्वामी आणि गौतम अशी आरोपींची नावे आहेत. 30 डिसेंबर रोजी वराछा पोलीस स्टेशन क्षेत्रात एक घटना घडली होती. 65 वर्षीय वृद्ध आपली कार चालवत होते, तेव्हा मनीषाने त्यांना हसून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. मनीषाने वृद्धाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मनीषाने वृद्धाला वराछा परिसरातील वराछा सोसायटीतील एका इमारतीत बोलावले आणि तिसऱ्या मजल्यावर नेले. तिथे तिने वृद्ध व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा नाटक केले. वृद्धाने जेव्हा आपले कपडे काढले तेव्हा दोन पुरुष खोलीत शिरले.

दोन्ही आरोपींनी वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल करू लागले. आरोपींनी वृद्धाला धमकी दिली की, जर त्याने पैसे दिले नाहीत तर त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. धमकीने घाबरलेल्या वृद्धाने आपले 2 सोनेरी कडे आणि 1.15 लाख रुपये रोख दिले. वृद्ध व्यक्तीने ही घटना त्याच्या एका मित्राला सांगितली. मित्राने त्याला पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितली. तक्रार दाखल झाल्यानंतर वराछा पोलिसांनी मनीषा, निलेश गोस्वामी आणि गौतम यांना अटक केली. आरोपींपैकी एक निलेश गोस्वामी हा पोलिसांचा खबऱ्या आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

संतापजनक! चिमुकलीवर 65 वर्षांच्या वृद्धाने बनवलं वासनेचा शिकार…

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!