
करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
मुंबईः अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी करीना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे. करीनाच्या जबाबातून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे माहिती मिळाले आहे. घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक होता, त्याने यावेळी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती करीनाने पोलिसांना दिली आहे.
करीनाने पोलिसांना जबाब सांगितले की, ‘चोर घरात शिरल्याचे पाहिल्यानंतर नर्सने आरडा-ओरडा केला. त्यानंतर सैफ आणि मी त्याच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. चोर घरात असताना काही मौल्यवान वस्तू दागिने असताना ते त्याने चोरले नाहीत. आरोपी घरात चाकूचा धाक दाखवून नर्स लिमाकडे एक कोटी रूपयांची मागणी केली. अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन आल्याचे पाहिल्यानंतर घाबरले होते. जेव्हा आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक दिसत होता. पण, त्याने घरातून काहीही चोरी केली नाही.’
सैफ आणि तो व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली. आम्ही सर्वजण त्याच्यापासून लांब जाण्यात आणि घराच्या 12 व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झालो. दागिने घरात समोर ठेवले होते, पण हल्लेखोराने त्यांना हातही लावला नाही. सैफ अली खानवर केलेल्या हल्यानंतर आरडाओरड केली, असेही करीनाने सांगितले. तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. या घटनेनंतर बहिण करिष्मा मला तिच्या घरी घेऊन गेल्याचे करीनाने सांगितले.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

