
सरिताचे घराशेजारी राहणाऱ्या विकाससोबत प्रेमसंबंध अन् आता जेल…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवतीने आपल्या प्रियकराच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना तेजी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोहरा गावात घडली आहे. दोघांच्या लग्नाला विरोध केल्यामुळे हत्या केल्याची माहिती युवतीने पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे.
चोहरा गावातील सरिता निशाद (वय २०) या युवतीचे शेजारी राहणाऱ्या विकास सोबत प्रेमसंबंध होते. तिनं आपल्या प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु विकासच्या आईने या लग्नाला नकार दिला. या नकारामुळे संतापलेल्या सरिताने धारदार शस्त्राने विकासच्या आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर सरिता आणि तिच्या शैलेश निशाद आणि अक्षय निशाद या दोन भावांनी तसेच वडील बृजबान निशाद यांच्या मदतीने मृतदेह घरापासून 400-500 मीटर अंतरावर जंगलात लपवून ठेवला होता. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सरिता आणि तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले असून, सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पोलिस चौकशीत सरिताने कबुल केले की, ‘ती विकास निशादवर प्रेम करत होती आणि लग्नासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होती. मात्र, विकासच्या आईच्या विरोधामुळे तिने हत्येसारखा गंभीर गुन्हा केला.’ दरम्यान, पोलिस पुढील तपास करत आहेत.
वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…
एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

